जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणास व्हॉटसअॅपवरून संपर्क करून त्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ऑनलाईन खंडणी उकळल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ३१ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फेब्रु- २०२१ ते ८ जून २०२२ रोजी पावेतो ८४२१९७९७१८ या नंबरवरून पिडीत तरुणाच्या व्हॉटसअॅपवर मॅसेजेस करुन, चॅटींग करुन, तसेच पिडीत तरुणाच्या काम भावना उत्तेजीत केल्या. तसेच खून झालेल्या तसेच रक्तबंबाळ असलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हाट्सअपद्वारे पाठवून पिडीत तरुणास त्याचा अश्या प्रकारे मृत्यू घडवून आणेल, अशी धमकी दिली. तसेच पिडीत तरुणाचे अर्धनग्न व्हिडीओ निवडणूक मधील विरोधी पार्टीला पाठवुन Viral करण्याची धमकी देखील दिली. यानंतर पिडीत तरुणाकडून ‘फोन पे’वरून ४ एप्रिल २०२२ रोजी १५ हजार रुपये, दि. ७ जून २०२२ रोजी २ हजार रुपये असे एकूण १७ हजार रुपये ऑनलाईन स्विकारले. तसेच वारंवार पैशांची मागणी केली म्हणून ८४२१९७९७१८ या व्हॉटसअॅप धारक मोबाईल वापरणाऱ्या अज्ञात इसमांविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहेत.