चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातून दोन अल्पवयीन सख्या बहिणींना पळवून नेल्याप्रकरणी परभणीच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला आहे.
या संदर्भात अल्पवयीन मुलींच्या आईने चाळीसगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. अनुक्रमे १५ आणि १७ वर्षाच्या दोघं मुली तालुक्यातील एका गावात आपल्या नातेवाईकांकडे आले होते. येथून दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ : 30 वाजेच्या सुमारास संतोष कैलास सोनवणे आणि समीर शेख (पूर्ण नांव माहित नाही, दोन्ही रा.परभणी) यांनी संगणमत करुन दोन्ही मुलींना पळवून नेले आहे. यासंदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ नितीन सोनवणे हे करीत आहेत.
















