धरणगाव (प्रतिनिधी) आज १४ नोव्हेंबर म्हणजेच जागतिक बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कु.पार्थ सागर भारुडे या बालकाला मामाच्या गावाला जाऊया..! हा ग्रंथ भेट देण्यात आला.
याप्रसंगी वृषाली सागर भारूडे, कु.आराध्या भारुडे, बाबा रविंद्र गजानन भारुडे, आदी उपस्थित होते. प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण विकत घेता येत नाही..! असे गौरवोद्गार कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भारुडे यांनी केले तर आभार वृषाली सागर भारुडे यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वीते साठी मनिष चौधरी,गौरव चौधरी,ओम कोळी,अरविंद चौधरी आदींनी केले.