धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे संपूर्ण भारतात ४ जुलैला आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे तालुकास्तरावर निवेदन देणे याचाच एक भाग म्हणून तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ४४० रुपये क्विंटल कमिशन किंवा ५० हजार रुपये महिना मानधन द्यावे, गहू, तांदूळ, साखर उचल करून वाटप करताना होणारी तूट अर्थात हंडलिंग लॉस मिळावा तसेच गहू, तांदूळ, साखरेसोबत तेल व डाळीचे ही शासनाने वाटप करावे, गॅस वितरण पद्धतीत कमिशन वाढ करावी, प्लास्टिक गोणी ऐवजी ज्यूट बारदानमध्ये धान्य मिळावे. कोरोना महामारीत स्वस्त धान्य दुकानदारांना वीरगती प्राप्त झाली अाहे. त्यांना कोरोना योद्धा म्हणून संबोधून त्यांच्या कुटुंबांना सर्व मदत करावी, केंद्राने वाढ केलेले २० रुपये व ३७ रुपये कमिशन राज्य सरकारने द्यावे, पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रात ही मोफत धान्य द्यावे तसेच सर्वरचा होणारा प्रॉब्लेम त्वरित दूर करावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना देण्यात आले. निवेदन देताना जी. डी. पाटील, अरविंदकुमार ओस्तवाल, अमृत पाटील, अमोल पाटील, रवींद्र महाजन, सुधाकर पाटील, संजय भालेराव, दिलीप शिंदे, सुवालाल मोरे आदी उपस्थित होते.