धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील स्वामी समर्थ नगरात परिसरातून सेटिंगच्या प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बांधकाम व्यासायिकांमध्ये भीती पसरली आहे.
शहातील स्वामी समर्थ नगरात मंदिराचे बांधकाम सुरु आहे. दि २० सप्टेबर २०२२ रोजी या ठिकाणाहून गणेश महाजन यांच्या मालकीच्या अंदाजे किंमत १७ हजार ५०० रुपये किंमतीच्या ४४ सेटिंगच्या प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी गणेश महाजन यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद देत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.ना.प्रमोद पाटील हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे बांधकाम व्यासायिकांमध्ये भीती पसरली आहे.