धरणगाव (प्रतिनिधी) मुसळी येथील ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारलेले भव्य शिव प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिसरातील जनतेला स्फुर्ती देत राहील, असे प्रेरणादायी प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ होते.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जि.पं. सदस्य गोपाल चौधरी, पं.स. सभापती मुकुन्द नन्नवरे, सरपंच सौ. इंदुताई पाटील, एकलग्न सरपंच संजय पाटील, पी. आर. गायकवाड, अनिल पाटील, मोहन पाटील राजू भैया पाटील, विभाग प्रमुख टिकाराम पाटील, उपसरपंच लहू ठाकरे, भागवत चौधरी, गोकुळ नाना पाटील, ग्रा.वि.अधिकारी पाठक, मधुकर मराठे, रमेश गुंजाळ, वसंत पाटील, प्रशासक संजय कुमार शर्मा, यांच्या सह मुसळी व चिंचपुरा परिसरातील सरपंच व ग्रा.प. सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते पी.के.पाटील यांनी केले. तर आभार गोकुळ नाना पाटील यांनी मानले. यावेळी मुसळी येथे ग्राम पंचायतीवर १००% महिला राज होते. त्यांच्या काळातील गावाच्या विकासासाठी विविध विकास कामे व भव्य दिव्य असे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार केल्याबद्दल पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी माजी सरपंच इंदु पाटील, निर्मला गुंजाळ, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.