जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित तथा उद्योजक सुनील झंवरला मुंबई हायकोर्टात आज जोरदार झटका बसला. झंवरने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आज साधारण ८ ते १० वकिलांची फौज उभी केली होती. परंतू गतवेळेस तुम्हाला १५ दिवस अटकेपासून संरक्षण दिल्यानंतरही तुम्ही सेशन कोर्टात का गेले नाही?, असा सवाल कोर्टाने विचारला. त्यानंतर झंवरने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला.
मुंबई उच्च न्यायालयात सुनील झंवरने फिर्याद रद्द व्हावी, यासाठी दाखल याचिकेवर सुनवाई दरम्यान, हायकोर्टाने झंवरला दिलासा दिला होत. झंवरला दोन आठवडे अटकेपासून संरक्षण देत या दोन आठवड्याच्या आतच झंवरला सेशन कोर्टातून आपला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार होता. परंतू झंवरने पुन्हा एकदा हायकोर्टाच अटकपूर्व जामीनसाठी अर्ज ठेवला. त्यावर आज न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्हाला १५ दिवस अटकेपासून संरक्षण दिल्यानंतरही तुम्ही सेशन कोर्टात का गेले नाही?, असे विचारात कोर्टाने नाराजी व्यक्त केली. तसेच पुन्हा एकदा अंतरिम संरक्षण देण्यापासून नकार दिला. झंवरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकार पक्षाकडून अॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार आक्षेप घेतला. अॅड. चव्हाण यांनी म्हटले की, न्यायालयाने आरोपीला १५ दिवसांचे अटकेपासून संरक्षण दिले होते. याच दरम्यान त्यांनी सेशन कोर्टात जाणे अपेक्षित होते. परंतू तसे झाले नाही. तसेच दुसऱ्यांदा अटकपूर्व जामीन अर्ज टाकल्यानंतर पोलिसांना माहिती दिली नाही. दरम्यान, ज्येष्ठ विधीतज्ञ नितीन प्रधान, क्षुब्धा खोत यांच्यासह साधारण ८ वकिल आज झंवरची बाजू मांडण्यासाठी कोर्टा समोर उभे होते.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता आहेत. यातील सुनील झंवर व अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यानुसार दोघांच्या घरावर नोटिसा डकविण्यात आल्या होत्या. परंतू तत्पूर्वीच झंवर न्यायालयासमोर हजर झाला. त्यानंतर कोर्टाने त्याला १५ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.
















