बोदवड (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी विजय मुरलीधर घाटे (वय ४२) हे दि. २३ फेब्रुवारी दुपारी २ वाजेपासून शहरातून बेपत्ता झेल आहेत. या प्रकरणी बोदवड पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
विजय घाटे हे सहकारी निबंधक कार्यालयात जातो सांगून घरून बाहेर गेले ते रात्री उशिरापर्यंत व दुसऱ्या दिवशी सकाळीपण घरी न आल्यामुळे त्यांची पत्नी रेखा घाटे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याबाबत नोंद केली. सदर व्यक्तीची उंची पाच फूट पाच इंच असून अंगात राखाडी शर्ट, काळी फुलपँट घातली असून उजव्या भुवईवर मस असे वर्णन आहे. या बाबत कोणास काही माहिती मिळाल्यास बोदवड पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे, आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पो. ना. प्रमोद तायडे हे करीत आहेत.
















