बोदवड (प्रतिनिधी) आज बोदवड शहरात दुपारी 12 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या धोरणातून राज्यासह देशात वाढलेल्या महागाई विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मलकापूर चौफुल्लीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात ’50 खोके महागाई एकदम OK’, जनता भरते GST गद्दार जातात गुवाहाटी, महागाईने दुखते डोके, गद्दारांना 50 खोके…50 खोके, बहोत हो गई महागाई की मार, चलो हटाये मोदी सरकार’, अश्या घोषणा देऊन राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष विनोद कोळी,रा.यू.ता उपाध्यक्ष दिलीप पोळ, राष्ट्रवादी यवक शहर अध्यक्ष अक्षय चौधरी,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रदीप बडगुजर,राष्ट्रवादी प्रवक्ते प्रमोद धमोळ, नगरसेवक भरतअप्पा पाटील, नईम खान बागवान, गोपाळ गंगातीरे, हकीम बागवान, रवी खेवलकर, सोनू मणियार, निलेश माळी, फिला राजपूत, राजेश जैस्वाल, किरण वंजारी, विजू चौधरी, आनंदा पाटील, इजहार शेख, भूषण पाटील यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते हजर होते.