TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवारांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा समाजाला प्रेरणादाई : एकनाथराव खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शरद पवारांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा समाजाला प्रेरणा तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना उत्साह देणारा आहे. या देशात शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत, ज्यांचे सर्वपक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शरद पवारांनी महाराष्ट्रात जे काम करून दाखवले, ते कुणाच्या स्वप्नातही नव्हते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या,अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खडसे पुढे म्हणाले की, एवढ्या जणांची एकत्र मोट बांधून त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. हा पवारांच्या कौशल्याचा एक भाग आहे. महाराष्ट्रात जे सरकार आहे ते त्यांच्याच आशीर्वाद, विश्वास आणि कल्पनेमुळे आहे. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभे करण्याचे महत्त्वपूर्ण काम शरद पवारांनी ज्या कौशल्याने केले, त्याला तोड नाही. पवारांनी ज्या पद्धतीने किल्लारी भूकंपग्रस्तांचा प्रश्न सोडवला, त्याच धरतीवर गुजरातच्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यात आली. ही पवारांच्या कामाची सर्वात मोठी पावती आहे. समाजात असे लोक फार मोजके असतात. अनेक जण जन्माला येतात, जन्माला येणारा प्रत्येक जण मरणार आहे. किती वर्षे जगले, यापेक्षा कसे जगले, काय कर्तृत्व केले, याला महत्त्व आहे, एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. ते दुरून आले असे नाही तर कुठेतरी ओलावा होता म्हणून नाथाभाऊ इकडे आले, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. एका चांगल्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली, या गोष्टीचा मला आनंद आहे. पवारांनी फक्त मलाच संधी दिली असे नाही, तर त्यांनी माझ्यासारख्या अनेकांना संधी देऊन मोठं केले आहे. इतर नेत्यांकडे पहा, त्यांचे आकलन करा, काही नेते विशिष्ट गुणांनी मोठे असतील पण शरद पवार हे सर्वगुण संपन्न नेते आहेत. राजकारणाचा भाग सोडा, समाजकारणाच्या माध्यमातून साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातही त्यांनी नाव कमावले असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवसनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जळगावातून एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या, त्यावेळी ते बोलत होते. शहरातील कांताई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार मनीष जैन, संतोष चौधरी, गुरुमुख जगवानी, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ४८ कोरोनाबाधित, ४९ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

June 26, 2025

एरंडोलच्या नवीन आठवडे बाजाराला श्री संत सावता महाराजांचे नाव देण्यात यावे ; माळी समाजाची मागणी !

December 4, 2021

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सायकल दौऱ्यासह चौकसभा

April 20, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २४ जून २०२३ !

June 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group