जळगाव (प्रतिनिधी) भावजयीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपी दिराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पिडीतेने औरंगाबाद येथे गुन्हा दाखल केल्यानंतर झिरो नंबरने तो गुन्हा एमआयडीसी पोलिसात दाखल करण्यात आला होता.
शहरातील मेहरूण परिसरातील एका विवाहिता कौटुंबिक वादामुळे सासु सासऱ्यांपासून पती आणि मुलीसह शहातीलच एका भागात वेगळी राहत होती. ६ मार्च २०२० रोजी विवाहिता एकटी होती. याचाच फायदा घेत नात्याने लहान दिर असलेल्या शकील पिरजादे याने बळजबरीने अत्याचार केला. असहाय्य विवाहिता रडत असल्याचे पाहून शकीलने ५०० रूपये देवून कोणाला सांगू नको, अशी धमकी दिली. त्यानंतर समाजात बदनामी होण्याच्या भीतीने विवाहितेणे जळगाव सोडले आणि औरंगाबाद येथे राहण्यास गेली होती. परंतू त्यानंतर पिडीत विवाहितेने छावणी पोलीस ठाण्यात शकील पिरजादे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित शकील पिरजादे हा नशिराबाद येथे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. दरम्यान, गुन्हा झिरो नंबरने एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.