भुसावळ (प्रतिनिधी) येथील आयुध निर्माणीच्या मुख्यद्वारवर आज सकाळी कर्मचाऱ्यांनी कामावर जाते वेळी सरकारचे कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात घोषणा देत विरोध प्रदर्शन केले.
अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघ व अखिल भारतीय केंद्रीय कर्मचारी महासंघाचे आदेशानुसार देशातील सर्व संरक्षण क्षेत्रात तसेच देशातील ४१ आयुध निर्माणींचे कामगार आपल्या युनिटमध्ये सरकारचे कर्मचारी विरोधी नितिचा विरोध केला. सर्व कर्मचारी सकाळी मुख्य गेटवर जमा होऊन अंगावर लाल निळे झेंडे घेत प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा विरोध केला. आयुध निर्माणींचे निगमिकरण निर्णय रद्द करणे, FDI चा विरोध, संरक्षण मधिल भर्ती प्रक्रिया सुरू करणे, रिक्त पदे मंजूर करणे, कामगार कायद्यात बदलाचा विरोध, नवी पेन्शन रद्द करणे यांचेसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी १ दिवसीय विरोध प्रदर्शन केले.
किशोर बढे, दिपक भिडे, दिनेश राजगिरे यांनी सरकारचे कामगार विरोधी धोरण स्पष्ट केले – कार्यक्रम यशस्वीते साठी किशोर पाटील, मिलिंद ठोंबरे, नाना जैन, ज्ञानदेव सरोदे, राजु तडवी संतोष बाविस्कर यांचेसह युनियन पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. युनियनचे वतीने महासंघाचे उपाध्यक्ष कॉ राजेंद्र झा व दिनेश राजगिरे स्टाफ साईड जेसिएम सदस्य (तृतीय) आयुध निर्माणी बोर्ड कोलकाता यांनी सफलतेसाठी आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानले. स्थानिक संयुक्त संघर्ष समितीद्वारे १२ ऑक्टोंबर पासून सूरू होणाऱ्या देशव्यापी अनिश्चित कालिन संपासाठी तयारी करण्याचे आवाहन केले.