भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील पोलीस स्टेशनला जळगावचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी ‘सरप्राईज व्हिजिट’ देऊन शहरातील गुन्हेगारी संदर्भात माहिती जाणून घेत संपूर्ण आढावा घेतला.
डॉ.प्रवीण मुंडे यांनी यावेळी पोलीस स्टेशनला किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. किती गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे. तसेच हद्दपार केलेले किती आरोपी आहेत. गुन्हेगारांचे किती प्रस्ताव हद्दपारसाठी पाठविण्यात आलेले आहेत. याबाबत भुसावळ शहरातील पोलीस स्टेशनला एस.पी.ची “सरप्राईज व्हिजिट” देऊन पोलीस स्टेशनचा आढावा घेतला. शहर व तालुक्यातील पोलीस स्टेशनला किती कर्मचारी आहेत. पोलीस स्टेशनच्या व कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.तसेच कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चौकशी केली.शहरातील गुन्हे संदर्भात घटना कशा नियंत्रणार आणता येईल यावर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.तसेच शहर व तालुक्यात गावठी बंदुकी,पिस्टल,तलवार,चाकू तसेच मर्डरचे प्रमाण दिवसेन- दिवस वाढत आहे.तसेच गुन्हेगारांकडून शस्त्र साठा मिळून येत असल्याने आमचे मुख्य टार्गेट त्यांच्या मुळाशी जाऊन हा सर्व साठा मध्यप्रदेशात तयार केला जात आहे.त्या तयार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी सांगितले. त्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे.
तसेच ज्या पोलिसांचे गुन्हेगारांशी सबंध आहेत त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल.तसेच गुन्हेगारांसोबत पोलिसांचे वाढदिवस साजरा करण्यात आले आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्याची गय केली जाणार नसून कुठल्याही अवैध धंदे वाल्याना थारा देण्यात येणार नसून सततची निरंतर कारवाई केली जाणार आहे.बँक माफियांच्या विरुद्ध अनेक तक्रारी येत असून बँक मॅनेजरांना धमकविण्याचे प्रकार समोर आले असून खोटे प्रकरणवकरणार्या टोळीचा लवकरच पर्दाफाश केला जाणार असून त्यांची चौकशी करून लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी पत्रकारांना दिली.