जळगाव (प्रतिनिधी) शहरातील इदगाह कब्रस्तान जवळील मेन लाईनच्या इलेक्ट्रीक पोलला एका ट्रकने धडक देऊन सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस स्थानकात महावितरणचे सहाय्यक अभियंता उमेश पंडित घुगे (रा. सिंधी कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ईदगाह कब्रस्तान जवळील मेन लाईनच्या पोलला ट्रक क्रमांक (एम.एच २०, ए.टी २९६५ ) यावरील चालकाने तोच दिल्याने महावितरण कंपनीचा फुल वाकून व ग्राइंडिंग चे तारा तुटून सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान केलेले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहे का नितीन पाटील हे करीत आहे.