अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पाचपावली देवी मंदिर भागातील फायनल प्लॉट परिसरात तळमजला व पहिलामजल्यावरील असे एकूण २५ दुकानांच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन नुकतेच माजी.आ.कृषिभुषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले.
फायनल प्लॉट नं. ७७,७८ च्या जागेत दुकान संकुल बांधकाम करणे बाबत कामाचे आदेश वशि -१३/३१६ ७ सप्टेंबर रोजी देण्यात आले होते. सदर जागेवर तळमजला व पहिलामजल्यावरील असे एकूण २५ दुकानांचे बांधकाम होणार आहे. या बांधकामासाठी अंदाजित रक्कम रुपये ९८,८७,८९८ येणार आहे. सदर व्यापारी संकुलाच्या बांधकामांचा गुरुवार (दि.२४ ) रोजी भुमीपुजन सोहळा माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पाडला. यावेळी नगरसेवक राजु संदानशिव, प्रताप शिंपी, भुत बापु, विक्रांत पाटील, शेखा हाजी, फयाज दादा, बाबु सांळुखे, शितल देशमुख, नदीम शेख, जीवन पवार, अभियंता संजय पाटील, राधेश्याम अग्रवाल यांच्या उपस्थित पार पडलेला आहे. सदर प्रश्न हा नगरपरिषदेकडे हा सन- २०१५ पासून प्रलंबित होता. पर्यायीने नगरपरिषदेचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सदर प्रश्नी लक्ष घालुन हा प्रश्न मार्गी लावला. तसेच या कामाचे आदेश मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून दिलेले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार असून सदर २५ दुकानांचे व्यापारी संकुलांचा उपयोग २५ कुटुंबांचे उपजीवीकेचे साधन म्हणून होणार आहे.