बोदवड (प्रतिनिधी) – शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मानमोडी येथील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. तालुक्यातील भाजपाला महिनाभरात हा दूसरा धक्का आहे. एकीकडे भाजपाचे नेते एकनाथ खडसे हे पक्षांतराच्या तैयारीत असतांना दूसरीकडे तालुक्यातील एकेकाळचे खडसे समर्थक पक्षाला सोडचिट्ठी देत आहे. यावेळी अमोल पवार, कृष्णा पाटिल, मोहन पाटिल, विकास शिंदे, किरण शिंदे, गजानन कोकरे, नकूल कोळी, आत्माराम पाटिल, हिरालाल पाटिल, कैलास पाटिल, ञानेश्वर चौधरी, मयूर पवार, शुभम पाटिल, सोपान पाटिल, पंकज पाटिल, गणेश शिंदे, सागर पवार, तुषार पाटिल, गोपाल पाटिल, विशाल म्हसकर, प्रशांत पाटिल, संदिप पाटिल, आकाश पवार, चंद्रकांत चौधरी, उत्तम पाटिल, विशाल इंगळे, सोपान पाटिल, घनश्याम पवार या कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.