जळगाव (प्रतिनिधी) जळगाव दौऱ्यावर येत असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे रेल्वेतून सोबत प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार हे दि.16 जून रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यांचा दौरा प्राप्त झाला असून अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या एक दिवसीय शिबीरास ते मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, मुंबई येथून शरद पवार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव येण्यासाठी रेल्वेतून सोबत प्रवास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दोघांमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा झाल्याचे कळते. दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतू दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली की, नाही? हे मात्र कळू शकले नाही.
मागील काही दिवसापासून पालकमंत्री गुलाबराब पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे देखील दोघांच्या सोबत प्रवासाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.