धानोरा ता.चोपडा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या मोहरद येथे विज वितरणच्या भोंगळ कारभाराचा एक बारा वर्षीय शाळकरी मुलगा बळी ठरला वीजेचा खांबावर उतरलेल्या वीज प्रवाहाचा खेळतांना जोरदार शॉक लागुन या चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संतप्त नातेवाईकांनी विजवितरणच्या भोंगळ कारभारावर रोष व्यक्त करत प्रेत चक्क धानोरा विज कार्यालयात आणून कारवाईची मागणी केली. दुसरीकडे धानोरा येथे दोन भाऊंच्या अंगावर वीजेचे तार तुटून पडल्यानंतर सुदैवाने बचावाल्याची घटना घडली आहे.
यावेळी अडावदचे स.पो.निरिक्षक यांनी तात्काळ धानोरा गाठत जमावास शांत केले. याबाबत अधिक माहीती अशी की , गुरूवार ( ता .१ ) रोजी दुपारी १२ च्या सुमारास धानोरा रोडलगत राहत असलेले डिगंबर पाटील यांचा पाचवीत असलेला मोठा मुलगा क्रिष्णा डिगंबर पाटील ( वय ११ ) हा मराठी शाळेजवळ खेळत असतांना तेथून शेतशिवारात विजप्रवाह जाणारा एका खांबावर वीजेचा प्रवाह उतरेला होता . यात त्याचा त्याला धक्का लागताने तो जागेवरच कोसळला सोबत खेळणाऱ्या मुलांनी तशी माहीती जवळ असलेल्या ग्रा.पं कर्मचारी रमेश मोरे याला सांगताच त्याने त्याला लाकडाच्या साह्याने दुर करत नातेवाईकांना घटना कळवली . बालकाला तात्काळ धानोरा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याला डॉ . उमेश कवडीवाले यांनी मृत घोषीत केले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी हृदय पिळवून टाकणारा आक्रोश केला व गावात शोककळा पसरली.
मृतदेहाचे शवविच्छेदन करून संध्याकाळी सहाच्या सुमारास परत आणले मात्र एवढी गंभीर घटना घडून तब्बल सहा तास उलटूनही विज वितरणचा एकही अधिकारी घटनास्थळी न आल्याने नातेवाईक व ग्रामस्यांचा संताप अनावर होत मोहरद जाणारी मृतदेहाची गाडी परत बोलवत थेट धानोरा विजवितरण कार्यालयात नेली , येथे नातेवाईकांनी विजवितरच्या भोंगळ कारभावर संताप व्यक्त करत सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व व मृताच्या नातेवाईकांना तात्काळ मदतीचे लेखी द्या अशी मागणी केली . परिस्थीती गंभीर होत असल्याची माहीत अडावदचे स.पो.निरिक्षक योगेश तांदळे यांना कळताच त्यांनी तात्काळ ए.एस.आय जगदीश कोळंबे यांच्यासह धानोरा गाठत नातेवाईकांच्या भावना समजून घेत शांततेने मार्ग काढण्याचे आव्हान केले . यावेळी येथे उपस्थीत झालेले चोपड्याचे उपकार्यकारी अभियंता एम.एस.सावकारे यांनी मृतास पाच दिवसात सानुग्रह मदत देऊन पुढील शासकीय मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करून मदतीचे आस्वासन एपीआय यांच्या उपस्थीत दिले . यानंतर संध्याकाळी सात वाजता मोहरद येथे या चिमुरड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
धानो-यात दोन सख्खे भाऊ बालंबाल बचावलेत
येथिल सदगुरु नगर मधील राहीवाशी चंद्रकिरण मेडीकल चे मालक चंद्रकांत पाटील यांची दोन मुले संकेत,लोकेश ही नविन घराकडे दि ३० च्या रात्री दहा वाजता मोटारसायकल ने निघाले.यावेळी घराला वळसा घालून आपल्या नविन घरी झोपण्यासाठी जात होते.एवढ्यातच समोरील रोहीत्रावर मोठा स्फोट झाला.यामुळे दोन्ही भावांना समोरील काही वेळ काहीच दिसले नाही.तेवढ्याच त्या खांबावरील दोन तार त्यांच्या मोटारसायकल ला वेढा घातला.यात दोन्ही भाऊंना किरकोळ दुखापत झाली.दरम्यान सदगुरु नगर मधील अचानक घडलेली धक्कादायक घटनेने परीवारासह तेथिल राहीवाशी यांना चांगलच धक्का बसला.यावेळी रात्र जागुन काढली.यावेळी माजी उपसभापती माणिकचंद महाजन,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनवणे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.