प्रयागराज (वृत्तसंस्था) कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आज उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आहेत. मौनी अमावस्यानिमित्त प्रियांका गांधी यांनी संगम येथे सामान्य भाविकांप्रमाणे गंगास्नान केले. याआधी प्रियंका गांधींनी ऐतिहासिक आनंद भवनलाही भेट दिली. तसेच गंगा संगमावर स्नान केल्यानंतर प्रियंका गांधी मनकामेश्वर मंदिरात जाऊन देखील दर्शन घेणार आहेत.
याठिकाणी त्या शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची भेट घेणार आहेत. तसेच पुढील वर्षीच्या यूपीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका गांधी यांची राज्यातील उपस्थिती सातत्याने वाढत आहे. यापूर्वीही प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातच होती. सहारनपुरात आयोजित किसान महापंचायतीत प्रियंका सहभागी झाली, ज्याद्वारे प्रियंका यांनी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांवर निशाणा साधला होता. यूपीमध्ये सन २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, प्रियांका गांधी यूपी कॉंग्रेसचे प्रभारी आहेत, अशा प्रकारे येथे कॉंग्रेसला सतत बळकट करण्याचे काम केल जात आहे.