यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव येथील एका महिलेला लॉटरीचे आमीष दाखवून तब्बल ३ लाख ८० हजाराचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, मंगला महेंद्र बोरसे (वय ३८, रा. किनगाव) यांना ७३८९८८७३७७ या मोबाईलवरून २९ जून ते १ जुलै रोजी वेळोवेळी अज्ञात हिंदी भाषिक व्यक्तीने संपर्क साधला. त्यानंतर गोड बोलून लॉटरीचे आमीष दाखवले. तसेच मंगला बोरसे यांच्याकडून वेळोवेळी ‘फोन पे’वर एकूण ३लाख ८० हजार रुपये स्वीकारले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बोरसे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध यावल पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याबाबत पुढील तपास पो. नि. दिलीप भागवत हे करीत आहेत.