वरणगाव (प्रतिनिधी) सनातन धर्माच्या बळकटीसाठी आणि जनमानसाच्या मनामनात हनुमान चालीसा रुजवण्यासाठी वरणगाव येथील वासुदेव परिवारतर्फे आज 396 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे रेवा कुटी,वरणगाव याठिकाणी शनिवारी 396 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण उपक्रम राबविण्यात आला. सर्वात आधी पंचमुखी हनुमान पूजन, सामूहिक रामस्तुती यानंतर सर्वांनी मिळून 11 वेळा हनुमान चालीसाचे पाठ करण्यात आले. नंतर आरती आणि प्रसाद वाटप झाले. यावेळी सर्वांना टिळा लावण्यासाठी शिक्के दीपक फेगडे यांच्याकडून वाटण्यात आले. तबला वादक कुणाल शिंदे यांनी उत्तम साथ दिली.
यावेळी तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. विशाखा बेंडाळे, डॉ. रविंद्र माळी, उषा राणे, रुपाली महाजन, नयना पाटील, प्रीती महाजन, सुमती पाटील, चेतन पाटील, पियुष महाजन, दीपक फेगडे, चैताली फेगडे, सेजल फरकाडे ,डॉ.अनिल शिंदे, राम शेटे, कमलेश येवले, सुयोग चौधरी, प्रसाद चौधरी, अनिकेत चव्हाण, मानसी गोसावी, किरण चौधरी आदी उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय महाजन, कल्पेश वराडे, कृष्णा चौधरी, डॉ. नितु पाटील, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, दीपक फेगडे यांनी परिश्रम घेतले.
दर महिन्याच्या दुसरा शनिवार पठण…!
वासुदेव परिवार तर्फे आज जया एकादशी च्या शुभ मुहूर्तावर संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. आता हा उपक्रम दर महिन्याच्या दुसरा शनिवारी आयोजित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा आगामी काळात लाभ घ्यावा.
डॉ. अनिल शिंदे, सदस्य, वासुदेव परिवार, वरणगाव.