चोपडा (प्रतिनिधी) चोपडा नगपरिषद सन २०१९-२० या वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण करण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. सदरच्या कंत्राटात २१.५० लक्ष एवढा प्रचंड खर्च झाला असून त्याबाबत माहिती मागीतली असता गैरव्यवहार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी नेमलेली वृक्षरोपण गैरव्यवहार चौकशी समिती निव्वळ औपचारिकता, असल्याची घणाघाती टीका नगरसेविका यांनी केली आहे.
दोषींवर कठोर कारवाई करणेसाठी नगरसेविका संध्या नरेश महाजन यांनी मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांच्याकडे तक्रार अर्ज दि. २४ सप्टेंबर रोजी अर्ज सादर केला आहे. त्यास नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील यांनी अनुमोदन केले आहे. सदर तक्रार अर्ज दि. २४ सप्टेंबर रोजी आला असून नगरपरिषद संचालनालय यांच्या सदर प्रकरणी कारवाई करण्याबाबत बाबतच्या सुचना दि. २५ सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्या असताना मुख्याधिकारी यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
दि. २९ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद होत असल्याचे कळताच तात्काळ नगरपरिषदेतीलच अधिका-यांची चौकशी समिती नेमण्याची औपचारिकता करण्यात आली. हे म्हणजे आमचीच आरती व आमचीच ओवाळणी असा प्रकार आहे. त दोन समित्या आहेत. १. अभिलेख तपासणी समिती – सदर प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. मुळात कागदपत्रांची सत्यप्रती दिल्या गेल्या असताना त्यात नागरिकांना वाटप केले गेलेल्या रोपांची संख्या यापेक्षा सुमारे २०२७ जास्त रोपांची बीले काढण्यात आले असल्याने हे /ओपन अॅंड शट प्रकरण’ आहे.
क्षेत्रिय कामकाज परिक्षण समिती- २०१९-२० चे वृक्षारोपणाचे स्थळ पुरावे आज २०२० मध्ये कसे शोधणार हा यक्षप्रश्नच आहे. कारण ते पुरावे त्याच वेळेस पडताळून त्यानुसारच बीले काढली गेली पाहिजे होती. तसेच सदर कंत्राटदार हा संजिवनी नगर परिसरात २०१९-२० मध्ये रोपे वाटप केल्याबाबत नागरिकांच्या आज दि. ३० सप्टेंबर रोजी फिरत असल्याचे काही नागरिकांनी कळविले आहे. नागरिकांनी अशा कुठल्याही स्वाक्षरी करण्याच्या अवैध मागणीस प्रतिक्रिया देऊ नये. यावरुन चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करुन पाणीपुरवठा अभियंता यांना वाचिविण्याचा प्लॅन तयार असल्याचे दिसुन येत आहे. तसेच मागीतलेल्या माहिती अतंर्गत कागदपत्रे दिले गेले आहेत. संपूर्ण कागदपत्रे दिल्याचे पाणीपुरवठा अभियंता यांनी मान्य केले असुन तसे पत्र ही दिले आहे. तरी आता समितीच्या अहवालात मुख्याधिकारी हे कदाचित पाणीपुरवठा अभियंता यांना क्लिन चीट देण्याचा पुर्ण प्रयत्न करताना दिसुन येत असल्याचे सौ.महाजन यांचे म्हणणे आहे. वृक्षारोपण जनतेच्या करातून केले जाते. तरी सदर प्रकरणी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकाऱ्यांचा पक्ष न घेता सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या करातून येणा-या पैशाला न्याय द्यावा, अशी रास्त मागणी नगरसेविका सौ संध्या महाजन यांनी केली आहे.