*जळगाव (प्रतिनिधी)* येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी लेखणी बंद आंदोलन सुरु आहे. आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांची थेट खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे बोलणे करून दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे अॅड. कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे कर्मचारी संघटनेचे समन्वयक रमेश शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीने आंदोलनास लेखी पाठिंबा जाहीर केला. तसेच या कर्मचाऱ्यांचे खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्याशी ‘व्हीडिओ कॉल’वर बोलणे करून दिले. यावेळी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण समस्या सांगितल्या. खासदार सुप्रियाताई यांनी येत्या बुधवारी मुंबई येथे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या समवेत आयोजित केली असल्याचे सांगितले. तसेच्य मागणीबाबत त्वरित निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी महानगरध्यक्ष अभिषेक पाटील, सचिव कुणाल पवार, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे समन्वयक रमेश शिंदे, दुर्योधन साळुंखे, अरुण सपकाळे, राजू सोनवणे, सौ. मांडोळे यांच्यासह आंदोलन करणारे कर्मचारी उपस्थित होते.