नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या हॉस्पिटलमध्ये एका नवजात अर्भकाचा व्हेंटिलर अभावी मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या बाळाचा जन्म दिल्लीतल्या राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या हॉस्पिटलमध्ये झाला होता. परंतू बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतू बाळाला केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तब्येत आणखी खालावली आणि त्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे बाळाचे नातलग संतापले. संतापाच्या भरात त्यांनी केंद्र सरकारच्या हॉस्पिटलमधील एका नर्सला काही काळ एका खोलीत कोंडून ठेवले होते. या प्रकरणी तातडीने पोलिसांची मदत घेण्यात आली आणि नर्सची सुटका करण्यात आली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर बाळासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण हॉस्पिटल प्रशासनाने दिले. दरम्यान, बाळाच्या मृत्यूमुळे हॉस्पिटलमधील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.