जळगाव (प्रतिनिधी) शिरसोली गावाजवळ झालेल्या रस्ते अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर अन्य दोघं जखमी झाले आहेत.
यासंदर्भात अधिक असे की शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे सीएमओ डॉ. दीपक जाधव यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, १५ ऑक्टोबर रोजी शिरसोली गावाजवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रस्ते अपघातात मार लागल्याने एक अनोळखी इसम मयत स्थितीत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. परंतू नंतर भगवान धनराज चौधरी (वय 46 रा. म्हसावद) असे मयताचे नाव निष्पन्न झाले. तर प्रल्हाद धनराज चौधरी (वय ५२) व हिरालाल काशिनाथ कुंभार (वय 38 रा शिरसोली) हा एक जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात वाहनावरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ अतुल पाटील हे करीत आहे.