रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे कुर्हाडीने वार करून निर्घुण खून करण्यात आलेल्या चारही भावंडांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात दफनविधीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांची कुर्हाडीने वार करून खून करण्यात आला होता. यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. उर्वरित तिन्ही भावंडांचे शवविच्छेदन झाल्यानंतर चौघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आदिवासी परंपरेनुसार दफनविधीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षक आदींसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. तर लोकसंघर्ष मोर्च्याच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे या देखील यावेळी उपस्थित होत्या.