साकळी ता.यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी ते पिळोदा रस्त्यावरील काटेरी झुडपे खूप वाढली होती. अगदी पिळोदा येथील नागरिकांना याठिकाणून ये-जा करणे कठीण झाले होते. त्यामुळे रस्त्यावरील काटेरी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने नुकतीच काढण्यात आली.
पिळोदा येथून साकळी येथे आपल्या कामानिमित्त शेवडो लोक रोज येत असतात. त्यांना या काटेरी झुडपांच्या रस्त्यावरुन वाहन चालवणे अपघड झाले होते. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन सामजिक कार्यकर्ते अजय पाटील व काही ग्रामस्थांनी जि.प सभापती रवींद्र पाटील व पंचायत समिती उपसभापती दिपक आण्णा पाटिल यांची भेट घेऊन साकळी ते पिळोदा रस्त्यावरील काटेरी झुडपे काढून देण्याची मागणी केली होती . मागणीची तत्काळ दखल घेऊन जि.प सभापती रवींद्र पाटील व पंचायत समिती उपसभापती दिपक आण्णा पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली दि २७ सप्टेंबर २०२० ते २९ सप्टेंबर २०२० रोजी साकळी ते पिळोदा रस्त्यावरील काटेरी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. त्यामुळे पिळोदा वासीयांना दिलासा मिळाला आहे.