भडगाव (सागर महाजन) तालुक्यातील कोठली येथील विनायक महादु पाटील या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात सलग तिसऱ्यांदा पपई बाग व झेंडू फुलांचा आंतरपिक पद्बतीने ठिबक सिंचनवर आधारीत शेती कसण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. लाखोंचे उत्पन्न मिळण्याची त्यांना आशा आहे. पावसाळ्यात झेंडू फुलांच्या नुकसानीची मोठी आफत या शेतकऱ्याला सोसावी लागली आहे असून खूप मेहनत घेऊन त्यांनी ही झेंडूची शेती वाचविली आहे. सध्या झेंडूची पिवळे व केशरी रंगाची आकर्षक फुलांची बाग फुलली असुन साऱ्यांचेच आकर्षण बनले आहे. झेंडू फुलांना मागणी वाढली असुन नवराञोत्सव सुरु झाला. दसरा, दिपवाळी सण येत असुन फुलांचे भाव गगनाला भिडण्याची चिन्हे दिसत आहेत. या झेंडूचे एकरी लाखो रुपयांचे चांगले उत्पन्न मिळेल. अशी अपेक्षा विनायक पाटील या फुल उत्पादक शेतकऱ्याने द क्लियर न्यूज बोलतांना व्यक्त केली आहे. पपई अन झेंडू फुलांची अजब शेती विनायक पाटील सतत तीन वर्षापासुन घेत आहेत.
तिसऱ्यांदा पपई अन झेंडू फुलांच्या आंतर लागवडीचा शेतकऱ्याचा प्रयोग — भडगाव तालुक्यातील कोठली येथील विनायक पाटील यांचे शेत भडगाव ते कोठली रस्त्यालगत कोठली शिवारात आहे. या शेतकऱ्याने यावर्षी १ जुलै २०२० रोजी तीन एकर शेतात आंतरपिक लागवड पद्धतीने पपई अन झेंडूची झाडे लागवड केली आहेत. ३x३ या अंतरावर पपई तर ३x३ याच सारख्या अंतरावर झेंडू रोपांची लागवड केलेली आहे. झेंडूची रोपे कन्नडहुन अंकुर नर्सरीतुन ३ रुपये प्रतीरोप भावाने घरपोच मिळाले. ३ एकर क्षेञात तीन हजार झेंडूची रोपे बसली आहेत. पपईच्या रोपाची ग्रीनबेरी ही व्हरायटी लागवड केली आहे. २४ रुपये प्रति रोप इंदुरच्या नर्सरीतुन मागविले आहे. पपई हे दिड ते दोन वर्षांचे पिक मानले जाते. पपई लागवडीला एकरी खर्च एक लाखांपर्यंत येतो. पपईचे उत्पन्न ८ महीन्यात सुरु होते. माञ पपईचेही ३ ते ४ लाखांपर्यंत प्रति एकरी चांगले उत्पन्न मिळते. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ही हंगामात पपईचा गोडव्याचा अन उत्पन्नाचा हंगाम चालतो. पपईला ठिबक संच, मटेरीयल, रासायनिक खत, निंदणी आदि खर्च लागतो. पपईला प्रति एकरी खर्च लाखो रुपये येतो. तर पपईचे उत्पन्नही प्रति एकरी ३ ते ४ लाखांचे मिळते. तर झेंडू फुलांच्या बागेलाही प्रति एकरी खर्च फक्त ५ हजार रुपयांच्या जवळपास येतो. या झेंडू झाडाना आतापर्यंत वाटर सोलेबल मटेरियल सोडलेले आहे. ठिबक, निंदणी आदि खर्च येतो. झेंडू फुलांचे उत्पन्न एकरी १ लाखांचे मिळालेले आहे. पपई पिकाजवळ झेंडूचे झाडे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. झेंडुचे पिक ४ महिन्यात आकारते. लागवडीपासुन दीड महिन्यानंतर फुलांचे चांगले उत्पन्न निघण्यास तयार होते. पपई व झेंडू फुले आंतरपिक म्हणुन लागवड करण्याचे सलग तिसरे वर्ष आहे. अशी माहीती कोठली येथील पपई व झेंडू उत्पादक शेतकरी विनायक पाटील यांनी दिली.
झेंडूची आकर्षक बाग बहरली तशी फुलांना मागणीही वाढतेय – सध्या झेंडूची पिवळी व लाल आकर्षक रंगांनी झेंडूची बाग बहरलेली आहे. तशी फुलांना अधिक मागणी वाढतेय. सध्या झेंडूची रोपे पाचोरा मार्केटला प्रति ३० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. आता नवरोत्सव, दसरा, दिवाळी जवळ येत असुन फुलांचे भाव ५० ते १०० रुपयांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे. कारण पावसाळ्यात कमी झेंडूची फुलांची लागवड कमी आहे. त्यात झेंडू रोपांचे पाऊसामुळे झालेले नुकसान. त्यामुळे झेंडूच्या फुलांना वाढती मागणी वाढते. यामुळे यंदा झेंडू फुल हंगाम फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदयाचाच ठरणार आहे.
पावसाने केले सहा क्विंटल फुलांचे नुकसान — तालुक्यात मागे झालेल्या सततच्या पाऊसाने झेंडू झाडांना लगलेला मोठा फुलांचा हंगाम अवकाळी पावसामुळे वाया गेला आहे. जवळपास सहा क्विंटल झेंडूची फुले तोडून बांधावर फेकण्याची वेळ या शेकऱ्यावर आली आहे. हातात आलेल्या जवळपास १५ हजारांचे नुकसान झाल्याचे या शेतकऱ्याने सांगीतले आहे.