TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न, रायगड मोहिमेचे राज्यभरात कौतुक..!

vijay waghmare by vijay waghmare
June 11, 2025
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

किल्ले रायगड (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ७ जून ते १० जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘रायगड मोहीम 2025’ यंदाही उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात पार पडली. या मोहिमेद्वारे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवभक्त, विद्यार्थी आणि तरुणाईने रायगडाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक मोहिमेचे यंदाचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधीश रूप व भव्य-दिव्य दुर्गराज रायगडचे स्वरूप मनात साठवत चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवभक्तांचा ताफा आज भल्या पहाटे चाळीसगाव येथे सुखरूप परतला व रायगड मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

रायगडावरील मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भारत गोगावले यांनी आपल्या भाषणातून हजारो शिवभक्तांसमोर मंगेशदादांच्या उपक्रमाचे खुलेपणाने कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मंगेश दादा चव्हाण यांची रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याच्या मूल्यांचे प्रत्यक्ष धडे देणारे अद्वितीय कार्य आहे. अशा मोहिमा हेच खरे शिवराज्याचे जिवंत रूप आहेत.” अश्या शब्दात त्यांनी मोहिमेचे कौतुक केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

मोहिमेत सहभागी झालेल्यांसाठी राहण्याची, भोजनाची आणि प्रवासाची उत्तम सोय करण्यात आली होती. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हरवंडी आश्रम येथे मुक्कामी 1200 हून अधिक शिवभक्तांसाठी चहा-नाश्ता, आंघोळ, स्वच्छतागृहे, आणि दोन वेळेचे भोजन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व रायगड प्रवासात आमदार मंगेश दादा चव्हाण व पत्नी प्रतिभाताई चव्हाण हे शिवप्रेमी यांच्या सोबतच होते व त्यांनी लावलेली एकूणच व्यवस्था पाहता शिवप्रेमींची कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच ते दोघींनाही हातात हात घेऊन काळजी घेतली. यासाठी गेल्या महिनाभरापासून भाजपा व शिवनेरी फाउंडेशनचे पदाधिकारी देखील अहोरात्र परिश्रम घेत होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेली शौर्याची रात्र, आमदार मंगेश चव्हाण यांचा तरुणाईला मोलाचा संदेश

मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी रात्री हरवंडी येथे सुप्रसिद्ध शिवशाहीर चंद्रकांत माने यांच्या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून शिवचरित्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उभ्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उद्या आपण ज्या रायगडावर जाणार आहोत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आचरणाचा व राज्यकारभाराचा सर्वोच्च प्रतिक आहे. त्यामुळे तिथे वावरताना आपले आचरण देखील तसेच ठेवत जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुल्यांवर चालण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले,

रायगडावर प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा

१० जून रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे दर्शन घेताना हजारो शिवभक्तांनी ‘राजा शिवछत्रपती की जय’ च्या गजरात रायगड गड निनादवून सोडला. आमदार मंगेश चव्हाण यांनी गडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि उपस्थितांना स्वराज्य, शिस्त, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला.

पाच वर्षांची यशस्वी परंपरा

ही मोहीम सालाबादप्रमाणे सलग पाचव्या वर्षी यशस्वीरीत्या पार पडली असून, आमदार मंगेशदादांनी आपल्या प्रयत्नातून आतापर्यंत १६ हजाराहून अधिक तरुणांच्या मनात शिवप्रेम जागवले आहे. मतदारसंघातील युवकांना इतिहासाची जाणीव, संस्कार आणि संघटन यांचा अनुभव देणारी ही मोहीम भविष्यातही अधिक जोमाने राबविण्याचे आमदार चव्हाण आश्वासन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: "The Raigad campaign implemented by MLA Mangesh Chavan is a unique work that imparts Shiv Sanskar to the youth" – Deputy Chief Minister Eknathji Shinde#jalgaon

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जुलै ते 25 जुलै 2026 !

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जुलै 2026 !

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026

संतापजनक : सामूहिक बलात्कारची पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून दलित तरुणीची आत्महत्या !

October 3, 2020

मेहुणबारे-दहिवद जिल्हा परिषद गटात विकासाला गती मिळणार : आमदार मंगेश चव्हाण !

April 19, 2024

उद्यापासून रात्री संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group