जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी १०.५० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. जिल्हा नियोजन मंडळाकडून याबाबत कार्यवाही करण्यात आली असून निधी लवकरात लवकर मनपाकडे वर्ग करावा, यासाठी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले आहे.
जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी मिळावा अशी मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत याबाबत निधी देण्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाकडून याबाबत कार्यवाही करण्यात आली होती. मंजूर केलेला १०.५० कोटींचा निधी लवकरात लवकर मनपाकडे वर्ग करावा अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.