तमिळनाडू (वृत्तसंस्था) तमिळनाडू येथे घडलेल्या एका घटनेतील आरोपीचं वय १०२ वर्ष असून त्याला १५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तमिळनाडू येथील तिरुवल्लुर (Tiruvallur) येथे राहणाऱ्या १०२ वर्षाच्या विकृताने अल्पवयीन मुलीचं लंगिक शोषण केलं होतं. हे प्रकरण २०१८ मधील असून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.
न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे की, दोषीला १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५ वर्षांची साधी शिक्षा सुनावली आहे. दोषीनं २०१८ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तिरुवल्लूरच्या महिला न्यायालयानं दोषीला पीडित मुलीला ४५ हजार रुपये आणि ५ हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी दिल्लीत एका ६० वर्षीय निवृत्त IB अधिकाऱ्याविरोधात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ८ मार्च रोजी ही घटना घडली होती. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला नोकरीच्या बहाण्याने करोलबाग येथील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. आरोपीने हॉटेलमध्येच मुलीवर बलात्कार करून तिला घरी पाठवले. मुलीने घरी जाऊन ही माहिती पालकांना दिली. पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले आणि नंतर करोलबाग पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.