धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्याभरात चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या एका टोळीचा धरणगाव पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला होता. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या ५ आरोपींकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिस तपासात या चोरट्यांनी आणखी ११ मोटार सायकल काढून दिल्यामुळे आतापर्यंत एकूण ३१ मोटार सायकल जप्त करण्यात झाल्या आहेत. या टोळीतील तीन चोरट्यांना चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात अधिक असे की, बोरगाव ता. धरणगाव येथील जयेश पाटील याच्याकडे एकाच क्रमांकाच्या दोन मोटरसायकल आहे, अशी गुप्त बातमी पोलिस निरिक्षक जयपाल हीरे यांना मिळाल्याने पोउपनि अमोल गुंजाळ तसेच पो.हे.कों खुशाल पाटील, पो.ना मोती पवार, पो. कों दिपक पाटील, चा. पो.ना. गजेद्र पाटील, चा.पो.ना वसंत कोळी पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली. मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे संशयीतकडे मोटरसायकल मिळुन आल्याने त्याबाबत त्याची विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने भुषण विजय पाटील (रा. पळासखेडा सिम ता. पारोळा) यांचेकडुन सदर मोटरसायकल घेतली आहे असे सांगितले. तसेच त्यांने अनेक लोकांना जुन्या मोटरसायकल विक्री केल्या आहे व मोटरसायकल देतांना कागदपत्र नंतर देतो असे तो सांगत असतो अशी हकिगत सांगितली होती. त्यावरुन भुषण विजय पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. भूषण विजय पाटील याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने सागितले कि, ०९ मोटरसायकल भुषण घनराज पाटील व अमोल नाना पाटील (दोन्ही रा. शनी मंदीर चौक पारोळा ता. पारोळा) या दोन मोटरसायकल चोरांकडुन मागील एक ते दीड वर्षात वेळोवेळी १०,०००/- रुपये प्रत्येकी या प्रमाणे घेवुन समोरच्यास विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरुन १) भुषण धनराज पाटील, २) अमोल नाना पाटील यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी चिंचपुरा ता. धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपुर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करुन त्या ३) भूषण विजय पाटील (रा पळासखेडा सिम ता. पारोळा), ४) जयेश रविद्र चव्हाण (रा. जवखेडा ता.अमळनेर), ५) ज्ञानेश्वर राजेद्र धनगर (रा. वर्डी ता चोपडा) यांच्या मार्फतीने सामान्य लोकांना विक्री करत होते. दरम्यान, या दुचाकी चोरट्यांना आज तीन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. या चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, १) भुषण धनराज पाटील, २) अमोल नाना पाटील यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी चिंचपुरा ता. धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपुर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करुन त्या ३) भूषण विजय पाटील (रा पळासखेडा सिम ता. पारोळा) या तिघांना चोपडा पोलिसांनी पुढील तपासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपींकडून अॅड. संजय शुक्ला,अॅड. मनोज दवे, अॅड. उमेश पाटील यांनी काम पहिले.