जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १२०२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २१३, जळगाव ग्रामीण-३३, भुसावळ- १२४, अमळनेर-२२०, चोपडा-१०४, पाचोरा-६९, भडगाव-१५, धरणगाव-३६, यावल-६६, एरंडोल-८१, जामनेर-३३, रावेर-१२२, पारोळा-०९, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-५६, बोदवड-०९, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण १२०२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १०३ हजार ००९ पर्यंत पोहचली असून ८९ हजार ४६० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १८०९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११७४० रुग्ण सध्या उपचार घेताय.