धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव नगर परिषदेचा 159 वा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या औचित्याने नगर परिषदेमार्फत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल 159 वृक्षांची लागवड करण्यात आली.
या विशेष उपक्रमावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर, कार्यालय अधीक्षक भिकन पारधी, आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे, विद्युत अभियंता राहुल तळले, बांधकाम अभियंता निलेश तमखाने, कर प्रशासन अधिकारी मंगेश लंके तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर परिषदेच्या या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास चालना मिळणार असून पर्यावरण संवर्धनाचा एक स्तुत्य संदेश समाजात पोहोचला आहे.
















