TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिपनगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

vijay waghmare by vijay waghmare
December 19, 2025
in विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत अतारांकित प्रश्नाद्वारे केली.

आ. खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात सांगितले की, दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील अनेक प्रकल्पग्रस्त सध्या कंत्राटी तत्त्वावर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, मानधनवाढीसह इतर समस्यांचे निराकरण करण्याची त्यांची मागणी आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी ऊर्जा मंत्री, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का, चौकशीत काय निष्पन्न झाले आणि त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती देण्याची मागणी आ. खडसे यांनी केली. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

READ ALSO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; राजूमामा भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रकल्पग्रस्तांना विविध आस्थापनांमध्ये नियमित रोजगार मिळावा, यासाठी प्रगत कुशल प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले जाते. प्रशिक्षण कालावधीत त्यांना दरमहा विद्यावेतन दिले जाते.

महानिर्मिती कंपनीच्या प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ४३०, दिनांक ३० जानेवारी २०१९ नुसार प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना त्यांच्या अनुभव व शिक्षणानुसार दरमहा १४ हजार ते १६ हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५५९, दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ नुसार प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या विद्यावेतनात दरमहा २ हजार ते ५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

याशिवाय, वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींनाही दिलासा देण्यात आला असून, प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५६४, दिनांक १३ डिसेंबर २०२४ नुसार त्यांना एकदाच (वन टाइम) २ हजार ते ५ हजार रुपयांची विद्यावेतनवाढ देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दीपनगर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर विधानपरिषदेत सविस्तर चर्चा झाल्याने त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून, यापुढे आणखी ठोस निर्णय घेतले जातात का, याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; राजूमामा भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरचा फायदा; दिवसा वीजवापरावर साडेपाच कोटींची सवलत!

July 15, 2026
जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
Next Post

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी - प्रेम कोगटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा !

July 20, 2024

जळगावात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या !

October 26, 2020

एनडीपीएस कायद्यात सुधारणेसाठी केंद्राची महत्त्वाची शिफारस, ‘कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास…’

October 24, 2021

पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला दणका, भाजपचे समाधान आवताडे विजयी

May 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group