जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीने ३१ डिसेंबरच्या दिवशी खानदेश मॉल सेंटर जळगाव येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात एकूण १६ जोडपी विवाह बंधनात अडकले असून त्यांना हजारोच्या संख्येत उपस्थित लोकांनी आशीर्वाद दिले.
सामूहिक विवाह चे महत्व फारूक शेख यांनी विशद केले. मौलाना फिरोज साकेगाव यांनी मार्गदर्शन केले. रवींद्र भैय्या पाटील व वैशाली सूर्यवंशी यांनी नव वर वधूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष हारून नदवी यांनी या लग्न सोहळ्याचे निकाह पठण करून उपस्थित लोकांना अत्यंत सुरेख व समजणाऱ्या भाषेत मार्गदर्शन केले. मौलाना सलिक सलमान यांनी दुवा करू या कार्यक्रमाची सांगता झाली.
मान्यवरांचा गौरव !
बिरादरी ला सहकार्य करणारे इतर बिरादरी चे लोकांचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन साबीर मुस्तफाआबादीं व कासीम उमर तर आभार ताहेर शेख यांनी मानले.
या विवाह सोहळ्यात झालेली लग्न !
सानिया व अनिस (जळगाव)
मुस्कान (चोरवड) व अर्शद जळगाव
मिनाज,जळगाव व मुजम्मिल चोपडा
सूमय्या व असरार जळगाव
अल्फिया रावेर व अश्फाक, बोडवड
आफरीन मुंबई व मुस्तफा कासोदा
महेक साकेगाव व अलीम जळगाव
अर्शिन बाघडी व नाजीम खान सुरत
अर्शिया बी जामनेर व तनवीर शेख जळगाव
आफरीन जळगाव व साजिद फोपणार
रुबीना बी न्हावी व सिद्दीक एरंडोल
मुस्कान व मोहसीन पिंपराळा
सिमरन सिंदखेडा व फैजान रजा शहापूर
सानिया बी किनगाव व रईस शेख मुंबई
आयशा बी चोपडा अकील शेख शहादा
ईरम नाज जामनेर अबरार मुक्ताईनगर.