TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम !

अभेद्य जैन, आत्मन जैन यांची स्पर्धेला उपस्थिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत दि. 31 डिसेंबर रोजी दोन फेऱ्या खेळवण्यात आल्या. आतापर्यंत स्पर्धेत सात फेऱ्या झाल्या असून त्यात मुलींच्या गटात आघाडीवर असलेली आणि या स्पर्धेत आपल्या नैसर्गिक गुणवत्तेची चुणूक दाखवणारी

संनिद्धी भट व दिल्ली च्या साची जैन च्या रोमहर्षक मुकाबल्या मध्ये डावाच्या मध्यभागी एकापेक्षा एक चाली रचत संनिद्धी ने या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आपण प्रमुख दावेदार असल्याचे सिद्ध केले, २६ चालीत उंटाच्या बलिदानाने ३३ व्या चालीत प्याद्याच्या बलिदानाने व ३९ व्या चालीत हत्तीचे बलिदान देत आपले इरादे स्पष्ट केले. जशी संधी प्राप्त झाली तशी आपल्या वजिराने जोरदार मुसंडी मारत काळ्या राजावर मात केली.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

दुसऱ्या पटावर युपी ची फीडे मास्टर शूभि गुप्ता हिने अमुख्थाच्या कमकुवत राजावर हल्ला चढवत विजयश्री संपादन केली. तिसऱ्या पटावर साडेचार गुणांसह खेळणाऱ्या तमिळनाडू च्या निवेदिता ने प.बंगाल च्या स्पर्या घोष चा सहज पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले.

केरळच्या अनुपमा च्या सिसिलियन ग्रँड प्रिक्स हल्ल्याला सहजी परतवून लावत पांढऱ्या राजाला ‘ ह३’ जागेवर जायबंदी करत उंट, प्यादे व हत्ती चा वापर करून मात दिली. सातव्या फेरी अखेर , मुलींच्या गटात साडे सहा गुणांसह महाराष्ट्राची संनिद्धी भट आघाडीवर असून , तिच्याच पाठोपाठ अर्ध्या गुणांच्या फरकाने ६ गुणांसह उत्तर प्रदेश ची शुभी गुप्ता व साडे पाच गुणांसह प.बंगाल ची मृत्तिका आणि तमिळनाडू ची निवेदिता स्पर्धेमध्ये आगेचुक करत आहेत.

मुलांच्या गटात इम्रान व पारस उत्कंठावर्धक खेळ अनिर्णीत अवस्थेत निकाली निघाला तर दुसऱ्या पटावर जीहान शाह ने मयंक चक्रवती ला अंतिम स्थितीत बरोबरीत रोखले. सिसिलियन बचाव पद्धतीत खेळला डावामध्ये दिल्लीच्या दक्ष गोयल ने तेलंगणाच्या विघ्नेश ला चांगलेच कोंडीत पकडले होते पण वजिराची ई ३ जागेवर खेळली गेलेली चाल चुकल्याने जिंकण्याची संधी त्याने पूर्णपणे गमावली.

मुलांच्या गटात इम्रान ने आपली घोडदौड अशीच चालू ठेवली असून ६ गुणांसह तो स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवत असून, तब्बल ९ खेळाडू साडे पाच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. सामन्यागणीक स्पर्धा रंगतदार स्थितीत आली असून, या स्पर्धेचे विजेतेपद कुठला खेळाडू पटकावेल याची उत्कंठा सर्व बुद्धिबळ प्रेमींना आहे.

काल दोन फेऱ्यांचा झाला खेळ…

सकाळी झालेल्या फेरीच्या सुरुवातीला महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी सर्व सहभागी खेळाडूंशी संवाद साधला, त्यात ते म्हटले की, बुद्धिबळ हे तुम्हाला विचारशील आणि संयमी व्यक्ती बनवण्यास मदत करते, त्यामुळे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून खेळा.
तर दुपारी झालेल्या दुसऱ्या सत्रातील फेरीसाठी अभेद्य जैन व आत्मन जैन यांची विशेष उपस्थिती लाभली, यावेळी त्यांनी सहभागी खेळाडूंना जिद्दीने आणि एकाग्रतेने खेळा व नेहमी खेळण्याचा आनंद घ्या असा कानमंत्र दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
Next Post

'गोमातेचे रक्षण हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्‍य' ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ई-रुपी’चं लाँचिंग ; नेमके फायदे काय ?

August 2, 2021

पीएम-सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलाची झेप

September 22, 2025

मित्रांसोबत पोहायला गेला अन् घरी परतलाच नाही ; जळगावात ११ वर्षीय बालकाचा मृत्यू !

May 15, 2023

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार

January 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group