मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती आहे. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे.
या घटनेत पाच घरे पडली आहेत. दोन घरांतून मलबा काढण्यात आला आहे. तर तीन घरांतील मलबा काढणे अद्याप बाकी आहे. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली आहे. यात १७ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.