भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ विभागातून बिलासपूर विभागात जाणाऱ्या तब्बल १८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या लाइनच्या कनेक्टिव्हिटीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लाॅक घेतला आहे. यामुळे १८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकावरून सुटणार नाही.
या गाड्या रद्द
त्यात १२८७० हावडा-मुंबई २४ डिसेंबर, १२८६९ मुंबई-हावडा २६ डिसेंबर, १२८१२ हटिया-एलटीटी २४ व २५ डिसेंबर, २२८६६ पुरी-एलटीटी २८ डिसेंबर, एलटीटी-पुरी ३० डिसेंबर, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी २३ व २७ डिसेंबर, एलटीटी-भुवनेश्वर २५ व २९ डिसेंबर, २२५१२ कामाख्य-एलटीटी २५ डिसेंबर, एलटीटी-कामाख्य २८ डिसेंबर, १२८१० हावडा-मुंबई २६ डिसेंबर, मुंबई-हावडा २८ डिसेंबर, १२१५१ एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस २२, २३ व २९, तर शालिमार-एलटीटी ही गाडी २४, २५ व ३१ डिसेंबर, १२९४९ पाेरबंदर-सांत्रागाची २४ व सांत्रागाची ते पाेारबंदर गाडी २६ डिसेंबर, २२८९४ ही हावडा-साईनगर शिर्डी गाडी २३ व ३०, साईनगर शिर्डी ते हावरा एक्स्प्रेस २५ डिसेंबर आणि १ व २२ या दिवशी रद्द केली अाहे.
दरम्यान, दुसरीकडे भुसावळ विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकावर मंगळवार व बुधवार (२१ व २२) पादचारी पुलाच्या कामासाठी दोन दिवस दुपारी १.१५ ते सायंकाळी ५.१० या वेळात ब्लाॅक घेतला हाेता. यामुळे अप-डाऊन मार्गावरील तब्बल १३ रेल्वे गाड्या विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. मात्र, आज गुरुवारपासून या गाड्या सुरळीत धावतील