TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या सराफाला २१ लाखांना लुटले ; पोलिसासह व्यापाऱ्याला अटक !

२५ तोळे सोने, अडीच लाख रुपये जप्त ; औरंगाबाद पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2022
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील सराफ व्यापाऱ्याला शेंद्रा येथील व्यापाऱ्याने पोलिसाच्या मदतीने लुटल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कट रचणारा व्यापारी असून याप्रकरणी एका पोलिसाला देखील अटक करण्यात आली आहे. या पोलिसाने तब्बल २० लाख ७५ हजार ५३७ रुपयांचे सोने व रोख रकमेची बॅग लुटली होती. आरोपींच्या ताब्यातून दागिने आणि रोकड साडेआठ लाखांपैकी अडीच लाख रुपये जप्त केल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

व्यवहार फिस्कटल्यानंतर लुटले

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

रामचंद्र दत्तात्रय दहिवाळ (४२, रा. साईबाबा मंदिरासमोर हिरापूर) असे त्या सराफाचे तर संतोष तेजराव वाघ (३५, रा. महाल सोसायटी, फ्लॅट क्र.१०५, साई मंदिरासमोर, चिकलठाणा) असे संशयित आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अशोक विसपुते (५३, रा. पिंप्राळा, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे जळगावात ज्वेलर्स दुकान आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांचा आरोपी रामचंद्र दहिवाळसोबत फोनवरून परिचय झाला होता. दहिवाळचे शेंद्रा येथे भवानी ज्वेलर्स नावाने दुकान असून ते नेहमी विसपुतेंच्या संपर्कात होते. १२ सप्टेंबररोजी दहिवाळने विसपुतेंना फोन करून ‘मला मालाची गरज असून तुमच्या डिझाइन दाखवा’ असे सांगितले. त्यानुसार व्यापारी विसपुते हे नगरमार्गे कारने (एमएच १९, डीव्ही ६३३६) चालक दिनेश वाव्हळसह औरंगाबादेत आले. व्यापारी विसपुतेंनी दहिवाळला त्याच्या दुकानात दागिन्यांच्या डिझाइन दाखविल्यानंतर दहिवाळ यांना ‘मला डिझाइन आवडल्या, हे सोने मी ठेवून घेतो अन् तुम्हाला चेक देतो’ म्हणाला. परंतू विसपुतेंनी रोख पैसे मागितले. यामुळे व्यवहार फिस्कटला.

मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू असल्याचे सांगत घेतली वाहनाची झडती !
रात्रीचे दहा वाजेच्या सुमारास शेंद्राहून केंब्रिज चौकात आल्यानंतर विसपुतेंच्या कारच्या मागून एक कार (एमएच २०, एडब्ल्यू २१४४) आली अन् त्याने थांबविण्याचा इशारा केला. कारमधून एक पोलिस संतोष वाघ उतरला, त्याने ‘मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू आहे, दौरा म्हणजे काय कळते का? तुम्ही कोण आहात असे म्हणत कारची तीन वेळेस झडती घेतली. दोघांनाही मोबाइल बंद करण्यास सांगितले. त्यावर व्यापारी विसपुते यांना आधीच हृदयविकाराचा आजार असल्याने ते पुरते घाबरून गेले होते. कारमध्ये दागिने, रोकड सापडल्यानंतर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करतो म्हणत आरोपी वाघ याने १२ लाख ३५ हजार ५३७ हजारांचे दागिने आणि रोख ८ लाख ४० हजार रुपये असा २० लाख ७५ हजार ५३७ रुपयांचा ऐवज घेऊन गेला. यामुळे विसपुतेंची अचानक तब्येत बिघडली. तब्येत ठीक झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत असून न्यायालयाने दोन्ही आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसाच्या ड्रेसमध्येच व्यापाऱ्याला लुटले
विशेष म्हणजे व्यापारी विसपुतेंना लुटणारा पोलिसाची वर्दी घातलेला माणूस हा संतोष वाघ असल्याचे विसपुतेंना माहीत नव्हते. मात्र, पैसे, दागिने घेऊन जाताना अचानक विसपुतेंची तब्येत खालावल्याचे वाघ याने पाहिले होते. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी व्यापारी रामचंद्र दहिवाळ याने फिर्यादी विसपुतेंना फोन करून तब्येतीविषयी विचारणा केली, त्याचवेळेस विसपुतेंना आपल्याला याच व्यापाऱ्याच्या माध्यमातून लुटले गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पोलिस कर्मचारी वाघ याला बेड्या ठोकल्या.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

धरणगावात लवकरच सुरु होणार उपजिल्हा रुग्णालय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

*वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील 29 गावात 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित*

June 30, 2022

बीएचआर घोटाळा : महाजनांच्या गोटात थरथराट ; जामनेरातून अनेक जण रफू चक्कर !

June 17, 2021

दुर्दैवी घटना : विजेच्या धक्क्याने एका मुलीसह महिलेचा मृत्यू !

May 22, 2024

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group