मुंबई (वृत्तसंस्था) युकेच्या कोरोना व्हायरस व्हॅरिएंट अर्थात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले आणखी ३ पॉझिटीव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचं आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. पिंपरीमध्ये नव्या कोरोनाचे आणखी ३ रुग्ण आढळले आहेत. हे तिन्ही प्रवासी रुग्ण पिंपरी – चिंचवडचे असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पिंपरीमध्ये नव्या कोरोनाचे आणखी ३ रुग्ण आढळले आहेत. तिनही प्रवाशी पिंपरी चिंचवडचे असून नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात आता एकूण ११ प्रवाशी झाले आहेत’, असं ट्विट टोपे यांनी केलं. दरम्यान आतापर्यंत राज्यात ब्रिटनमधील कोरोना व्हायरच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेल्यांची रुग्णसंख्या ११वर पोहोचली असतानाच त्यातील २ रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नव्या स्ट्रेनच्या कोरोनाचा संसर्ग झालेले ११ रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. अर्थात या रुग्णंमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीत. महाराष्ट्रात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या जवळपास ४,८५८ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. युकेमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत पसरलेली असतानाच सावधगिरी म्हणून राज्यात हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या प्रवाशांपैकी १,२११ जणांना आतापर्यंत त्यांनी अत्यावश्यक अशा संस्तात्मक विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात नव्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील ११ जणांना नव्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यामध्ये मुंबईतील ५, तर पिंपरीत ३, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.