TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळी विमा क्षेत्राची पडताळणी १५ दिवसांच्या आत करावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडून विविध विभागांच्या प्रलंबित कामांची घेतली झाडाझडती !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिका क्षेत्र, मौजे कुसुंबे व मौजे नशिराबाद येथील अतिक्रमित घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ कार्यवाही १५ दिवसांच्या आत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात केळीचा पिक विमा काढलेल्या उर्वरीत क्षेत्राची पडताळणी ऑगस्ट महिन्याच्या आत करण्यात यावी, असे असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिले.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील या प्रकल्पांच्या प्रस्तावांची सद्यपरिस्थिती, प्रलंबित घरकुलांचा समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर सदरचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

READ ALSO

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव नगरपालिका हद्दीतील संजय नगर, नेहरूनगर व गौतम नगर येथील १७५४ अतिक्रमण घरांचा प्रश्न शासन निर्णयानुसार लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. नशिराबाद येथील गट नंबर २३२० मधील अपूर्ण बांधकाम असलेल्या घरकुले व अतिक्रमित घरकुले नियमित करण्याचा प्रश्न तसेच कुसुंबा येथील गट नंबर २३०/२ व ३१५ मधील अतिक्रमण नियमित करण्यासाठी शक्ती प्रदत्त समितीने तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.‌असे निर्देश ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.ठाकूर यांनी जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यापैकी ४४ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राची शेतकऱ्यांनी पडताळणी केली आहे. अद्याप ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्राची पडताळणी बाकी आहे. यावर पालकमंत्री यांनी सूचना दिल्या की, उर्वरित क्षेत्राची तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने पीक विमा कंपनीने तात्काळ पडताळणी करावी.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे नियमानुकुल करतांना ग्राम विकास विभागाचा २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून या जागेची मोजणी फी भरण्याची कार्यवाही करावी. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी एम.पी.मगर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, जळगाव गटविकास अधिकारी कसोदे, जळगाव प्रांताधिकारी महेश सुधळकर, एरंडोल प्रांताधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार नामदेव पाटील, धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव मुख्याधिकारी विकास नवाडे, नशिराबाद मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.या प्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, पी. एम. पाटील सर, नाशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, विकास धनगर, चेतन बरहाटे, ऍड भोलाणे, नरेंद्र सोनवणे, निलेश राजपूत, पंकज पाटील, सी. ए. हरिष आगीवाल, धनंजय सोनवणे यांच्यासह सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

सच्चीदानंद सूर्यवंशी यांना कृषिरत्न पुरस्कार प्रदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लातों के भूत बातों से…’; मनसे वीज बिलासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

November 19, 2020

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी ; सुवर्णकार कारागिरांना आर्टीजन स्मार्ट कार्डचे वाटप !

August 29, 2023

५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं ; जाणून घ्या… केव्हा कुठे होणार मतदान?

January 8, 2022

चाळीसगावात घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास !

January 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group