श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात 4 जवान शहीद झाले आहेत तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीय सैन्य सर्व क्षेत्रांमध्ये चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानलाही मोठे नुकसान सहन करावे लागले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानचे सहा ते सात सैनिक ठार झाले आहेत. एवढेच नव्हे तर पाकिस्तानमधील अनेक पोस्ट उद्धवस्त करण्यात आल्या. या गोळीबारामुळे बीएसएफचे निरीक्षक राकेश डोभाल यांच्यासह दोन सैनिक गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दरम्यान दोघांचा ही मृत्यू झाला. या गोळीबारात तीन नागरिकही मरण पावले आहेत. दुसर्या नागरिकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. भारताच्या प्रत्युत्तर दोन एसएसजी कमांडोसमवेत पाकिस्तानी लष्कराच्या ६ ते सात सैनिकांच्या मृत्यूची नोंद आहे, १० ते १२ पाकिस्तानी सैनिकही जखमी आहेत, पाकिस्तानी गोळीबारात भारतीय लष्कराचे तीन जवान आणि एक बीएसएफचा सैनिकही ठार झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी गोळीबारात तीन नागरिकही ठार झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पुंछ जिल्ह्यातील सावजीन भागातही पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करण्यात आले आहे.
शहीद बीएसएफचे सब इन्स्पेक्टर राकेश डोभाल हे गंगा नगर, ऋषिकेश, उत्तराखंड राहणार होते. युद्धबंदीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या दोन पोस्ट्स नष्ट झाल्या आहेत, तर पाच सैनिकही जखमी आहेत. याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. इतर शहीद जवानांची अद्याप ओळख पटलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पुंछ जिल्ह्यातील सावजीन भागातही पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करण्यात आला.