नवी दिल्ली (प्रतिनिधी) आज आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 47,240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनामुळे 930 रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण कोरोनाबाधित तीन कोटी 5 लाख 63 हजार 665 एवढे आहेत. तर दोन कोटी 97 लाख 99 हजार 534 अशी एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आहे. आजच्या घडीला देशात 4 लाख 59 हजार 920 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर 4 लाख 4 हजार 211 एकूण रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 36 कोटी 13 लाख 23 हजार 548 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.
आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात काल कोरोना व्हायरससाठी 19 लाख 7 हजार 216 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 42 कोटी 33 लाख 32 हजार 97 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. राज्यात काल 8, 418 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 548 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 58 लाख 72 हजार 268 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.06 टक्के आहे.