जळगाव (प्रतिनिधी) : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या बडतर्फी व अटकेसाठी सकल मराठा समाजातर्फे मंगळवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. या आंदोलनाला तब्बल ४७ संघटनांनी पाठिंबा दिला असून, उपोषणातही सहभाग घेतला. जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या ठिकाणीदेखील उपोषण सुरु झाले आहे. उपोषणाला सुरुवात करण्याआधी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार करून वंदन करण्यात आले.
अखिल भारतीय छत्रपती मराठा युवा संघटना, मराठा प्रीमियर लीग जळगाव, लोक संघर्ष मोर्चा मराठा, उद्योजक विकास मंडळ, संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ जळगाव, बुलंद छावा संघटना जळगाव, अखिल भारतीय युवक महासंघ जळगाव, मराठा क्रांती मोर्चा जळगाव, संभाजी सेना जळगाव, नारीशक्ती बौद्ध संघटना, कंजरभाट समाज जळगाव, नवयुवक मराठा विकास महामंडळ जळगाव, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ जळगाव, धनगर समाज महासंघ जळगाव, खाटीक समाज जळगाव, समता विकास परिषद जळगाव, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा जळगाव, मणियार बिरादरी जळगाव, खान्देश माळी महासंघ जळगाव, मौलाना आझाद विचार मंच जळगाव, अखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव, छावा मराठा युवा महासंघ जळगाव, अखिल भारतीय सिंधी सभा या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.