TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खेळात चांगली कामगिरी करुन पदके मिळावा- प्राचार्य देबाशीष दास

अनुभूती स्कूलमध्ये सीआयएससीई सहावी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा खुली

vijay waghmare by vijay waghmare
September 17, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. १६ (प्रतिनिधी) – ‘खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन काहीतरी नवीन शिकावे, खेळात चांगली कामगिरी करून पदके मिळवावे संधीचे सोने करावे…’ असे आवाहन सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या औपचारीक उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अथिती तथा अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य देबासीस दास यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे, महाराष्ट्र तायक्वांडो असोशिएशनचे अजित घारगे उपस्थित होते.

तायक्वांडो स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील ३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. १८ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होईल. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विविध राज्यांमधून आलेल्या खेळाडूंनी शानदार मार्च पास्ट केले. त्यात बिहार आणि झारखंड, ओडिसा, तामिळनाडू, पाँडिचेरी आणि अंदमान निकोबार, केरळ, कर्नाटक आणि गोवा, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा, उत्तर भारत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम भारत, पश्चिम बंगालचे संघ सहभागी झाले आहेत. मार्च पास्ट झाल्यानंतर मशाल ज्योत निघाली. प्राचार्य देबाशीस दास आणि तायक्वांडोची राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेली शेजल श्रीमल हिने मशाल प्रज्वलीत केली. विविध खेळांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेली मशाल ज्योत रन होऊन मुख्य ज्योत ज्योतीने लावली. त्यानंतर तायक्वांडोची शेजल श्रीमल हिने खेळाडूंना शपथ दिली. प्राचार्य देबासीस दास यांनी ही स्पर्धा खुली झाल्याचे जाहीर केले. या उद्घाटन प्रसंगी अनुभती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘दिल ये जिद्दी है…’ हे गाणे सादर केले. त्याचप्रमाणे मैदानी आखाडा दांडपट्टेचे चित्तथरारक प्रात्यक्षिके रावेर येथील शिवफुले मर्दानी आखाडा या मुलींच्या ग्रुपने सादर केले.

READ ALSO

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

उद्घाटनपर भाषणात प्राचार्य दास यांनी सांगितले की, सीआयएससीईद्वारा जुलै महिन्यात प्री-सुब्रतो राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या होत्या. त्यामुळेच ही राष्ट्रीय पातळीवरची तायक्वांडो स्पर्धा होत आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये १६ वर्षांखालील मुलांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा अनुभूती स्कूलच्या मैदानावर होणार आहे. तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भव्य अशी राष्ट्रीय योगासन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ.निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात येत असल्याचे प्राचार्य देबाशिष दास यांनी सांगत स्पर्धेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र संघात अनुभूती स्कूलच्या तीन खेळाडूंचा सहभाग

या स्पर्धेत महाराष्ट्र संघामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या पलक सुराणा, सुमृद्धी कुकरेजा, अलेफिया शाकीर हे तीन खेळाडू १९ वर्षे आतील वयोगटात सहभागी होत आहे. या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी, १७ रोजी सकाळी ९ वाजता अनुभूतीच्या बँडमिंटन हॉलमध्ये क्रीडागण पूजन होऊन स्पर्धांना सुरुवात होईल.

फोटो ओळी

DSC03988 : सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या औपचारीक उद्घाटन करताना प्राचार्य देवासीस दास, जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे, महाराष्ट्र तायक्वांडो असोशिएशनचे अजित घारगे.

DSC04061 : सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेची मशाल प्रज्वलीत करताना खेळाडू.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात मध्यरात्री रंगला चोर-पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार ; डीझेल चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक !

November 24, 2023

मोठी बातमी : मध्यरात्रीपासूनच अंधार, अनेक जिल्ह्यातील बत्तीगुल ; राज्य सरकारचा मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा !

January 4, 2023

…अखेर नांदेडच्या दफनभूमीतून वाळू वाहतूक बंद करण्याचे धरणगाव तहसीलदारांचे आदेश !

April 2, 2024

बँकांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर देशभरातील कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप

March 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group