जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर –११, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ- ०८, अमळनेर- ००, चोपडा-००, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०३, एरंडोल-००, जामनेर-०४,रावेर-०२, पारोळा-०१, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-११, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५५ हजार ०५५ पर्यंत पोहचली असून ५३ हजार ३३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १३१३ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ४०५ रुग्ण सध्या उपचार घेताय.