जळगाव (प्रतिनिधी) चार दिवसांपूर्वी चोरी झालेली दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दीपक दयाराम रुम (वय ३४) आणि दीपक एकनाथ शेले (वय ३१, दोघे रा. रेणुकानगर) यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
शहरातील मेहरुण परिसरात राहणारे सहाजीद हबीब खाटीक (वय २४) यांची दुचाकी ११ जानेवारी रोजी चोरीला गेली होती. यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास दरम्यान पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना या चोरीमध्ये दीपक रुम आणि दीपक शेले यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी राहुल तायडे, चंद्रकांत धनके, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, गणेश ठाकरे, अफजल बागवान आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे अनिल कांबळे, पराग दुसाने यांनी कारवाई करत भिलपुरा पोलिस चौकी परिसरात या दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली.