जळगाव (प्रतिनिधी) विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याबद्दल, कांतीलाल श्रीराम सपकाळे (वय ३५, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणासह त्याच्या कुटुंबियांना निर्दयपणे मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात आरोपींनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी झारा मारून त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून दिले. ही घटना दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भोई वाड्यात घडली. या अमानुष कृत्याबद्दल चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांची शोध घेण्याचे काम सुरू आहे.
शहरातील हरिविठ्ठल नगरातील भाई गल्लीत कांतीलाल सपकाळे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कांतीलाल यांची आई या नाली साफ करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणार महेंद्र पंडित भोई हा त्यांना विनाकारण शिवीगाळ करीत होता. यावेळी कांतीलाल यांनी आईला शिवीगाळ का करतात असे विचारले. त्याचा राग आल्याने महेंद्र भोई याने घरातून लोखंडी झारा घेवून येत त्याने कांतीलाल यांच्या डोक्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर भरत सपकाळे यांना क्रिश भोई याने लोखंडी सळईने मारुन दुखापत केली. तर त्यांचा मोठा भाऊ विक्रम सपकाळे व त्यांच्या आईना मनिषा भोई यांनी शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन धमकी दिली.