जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४९२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १२४, जळगाव ग्रामीण-५३, भुसावळ- २७, अमळनेर- ०२, चोपडा-७३, पाचोरा-०५, भडगाव-०३, धरणगाव-१३, यावल-०२, एरंडोल-१७, जामनेर-३७, रावेर-१८, पारोळा-०८, चाळीसगाव-८०, मुक्ताईनगर-१८, बोदवड-०७, इतर जिल्ह्यातील-०५ असे एकुण ४९२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६१ हजार ७६६ पर्यंत पोहचली असून ५७ हजार २५२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १३८९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३१२५ रुग्ण सध्या उपचार घेताय.